राज्यातील दारूची दुकाने उघडल्यामुळे किती कोरोनाबाधित बरे झाले याची यादी द्या; निलेश राणेंची मागणी


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी कोरोनाबाधितांची संख्या प्रार्थनास्थळे सुरू केल्यामुळेच वाढत असल्याचा दावा केला होता. राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे महापौर पेडणेकर यांनी म्हटले होते. दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी यावरून शिवसेनेला टोला लगावला.


सर्वात अगोदर दारूची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले अगोदर ती यादी जाहीर करा. शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक आहेत, असं म्हणत निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला.