डोनल्ड ट्रम्प ज्युनियर यांनाही करोना संसर्ग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या परिवाराला करोनाने चांगलेच विळख्यात घेतले असून ट्रम्प यांचा ४२ वर्षीय मुलगा डोनल्ड ट्रम्प ज्युनिअर यालाही करोनाचा संसर्ग झाल्याचे त्याच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. ज्युनियर डोनल्ड मध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती मात्र या आठवड्यात त्यांनी करोना चाचणी केली तेव्हा ती पोझिटिव्ह आल्याने सावधगिरी म्हणून तो क्वारंटाइन झाला असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

ट्रम्प ज्युनिअर पूर्वी स्वतः डोनल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलेनिया आणि त्यांचा मुलगा बॅरन याना करोना संसर्ग झाला होता. ट्रम्प यांच्यांवर वाल्टर रीड रुग्णालयात तीन दिवस उपचार केले गेले होते तर ट्रम्प यांनी बॅरन ट्रम्प १५ मिनिटात करोना मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. ट्रम्प कुटुंबियाना होत असलेल्या करोना संसर्गामुळे देशाच्या या पहिल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेत करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला असून एका दिवसात २ हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. हॉस्पिटल मध्ये बेड अपुरे पडत आहेत. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमेट्रिक्सच्या म्हणण्यानुसार मार्च २०२१ पर्यंत अमेरिकेत अंदाजे ४ लाख ७० हजार लोकांचा करोना बळी घेईल.