उत्ट्वीआगविग शहराने ६६ दिवसांसाठी दिला सुर्याला निरोप

पृथ्वीच्या द. ध्रुवावरील अलास्का मधल्या उत्ट्वीआगविग (Utqiagvik) शहराने या वर्षातील शेवटचा सूर्यास्त अनुभवला असून आता यानंतर ६६ दिवसांनी त्यांना नवी पहाट आणि नवा सूर्य उगविताना पाहता येणार आहे. सोशल मिडियावर या वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले गेले आहेत. हा सोहळा पोलर नाईट नावाने ओळखला जातो. २३ जानेवारीला येथील नागरिक पुन्हा चमकत्या सूर्याचे दर्शन घेऊ शकतील. तो पर्यंत येथे अंधाराचे साम्राज्य असेल.

याचा अर्थ हा भाग पूर्ण काळोखात असतो असा मात्र नाही. दिवसातील काही तास येथे उजेड असतो पण सूर्य दिसत नाही. इन्स्टाग्रामवर या शहरातील कर्स्टन अल्बार्ग या महिलेने सूर्यास्ताची एक क्लिप शेअर केली आहे. ती म्हणते,’ वर्षातला शेवटचा सूर्यास्त, त्याला निरोप देताना भरून येते आहे.’

पृथ्वीवरील उत्तर आणि दक्षिण धृवावर सूर्यप्रकाश एकाच वेळी पडू शकत नाही. उत्तर धृवावर सहा महिने दिवस असतो तेव्हा द. धृवावर काळोख असतो. उत्तर ध्रुवाला आर्क्टिक सर्कल म्हटले जाते तर द.ध्रुवाला अन्टार्कटीक सर्कल म्हटले जाते. अलास्का आर्क्टिक सर्कलचा भाग आहे. उत्ट्वीआगविग हे शहर अन्य भागाच्या तुलनेत अधिक उंचीवर आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबर पासून या शहरात सूर्यदर्शन होणार नाही. या काळात येथे कडाक्याची थंडी असते आणि तापमान उणे २३ डिग्री पर्यंत घसरते.