‘व्हॉट्सऍप चॅट’ हा अंमली पदार्थ प्रकरणी पुरावा नाही: न्यायालय


मुंबई: अंमली पदार्थ प्रकरणी व्हॉट्स ऍपवरील संवाद हा ठोस आणि पुरेसा पुरावा होऊ शकत नाही, असे अंमली पदार्थ विरोधी विशेष न्यायालयाने पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला सुनावले आहे.

सांताक्रूझ (पश्चिम) येथे राहणारे ऑस्ट्रेलयन वास्तुविशारद गेरार्ड बारटेल्स यांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. त्यांना न्या एस एच सातभाई यांनी जमीन मंजूर केला आहे.

या प्रकरणातील दोन आरोपांशी गेरार्ड यांच्या व्हॉट्स ऍप संवादावरून अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना सहा आरोपी केले आहे. त्यांच्याकडून इतर कोणताही मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला नाही.

व्हॉट्स ऍप संवादामध्ये आरोपी हा अंमली पदार्थ विक्री करीत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. मात्र केवळ हा संदेश म्हणजे सबळ पुरावा ठरू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणी आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले असते तर बाब वेगळी ठरली असती. पथकाने आरोपीला अटक केल्यानंतर महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर कोठडीची मागणी केली नाही, ही बाब पुरेशी बोलकी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.