काँग्रेसमधील वादावर फुंकर घालण्याचा सोनियांचा प्रयत्न


नवी दिल्ली- काँग्रेसमधील ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमध्ये रंगलेल्या वादंगावर फुंकर घालण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराज ज्येष्ठांपैकी तिघांची पक्षाच्या महत्वाच्या समित्यांवर नियुक्ती केली आहे. या समित्या परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थविषयक आहेत.

पक्षाच्या पडझडीबाबत सोनिया गांधी यांना पात्र देणाऱ्यांपैकी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या मुलाखतीनंतर अधीर रंजन यांनी त्यांना ‘पक्ष सोडा’ असे सुनावले होते. बिहार निवडणुकीत हे नेते कुठे होते, असा सवालही त्यांनी केला. त्यावर सिब्बल यांनी, ‘आम्हाला बिहार निवडणुकीपासून मुद्दाम दूर ठेवले,’ असे प्रत्युत्तराची दिले. या शाब्दिक झटापटीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

अर्थविषयक समितीवर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आनंद शर्मा आणि शशी थरूर यांची नियुक्ती परराष्ट्र विषयक समितीवर करण्यात आली आहे. गुलाम नबी आझाद आणि वीरप्पा मोईली यांना संरक्षणविषयक समितीवर नियुक्त करण्यात आले आहे. शशी थरूर आणि गुलाम नबी आझाद हे ‘ नाराज गटातील आहेत. पी चिदंबरम या गटात प्रत्यक्ष सहभागी नसले तरी या गटाबद्दल त्यांना सहानुभूती आहे.