दिल्लीतील प्रदुषणामुळे सोनिया गांधींनी गोव्यात हलवला मुक्काम


नवी दिल्ली – दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्या सल्लानुसार सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. सोनिया यांच्यासह राहुल गांधी देखील गोव्यात राहणार असून हे दोघेही काहीवेळापूर्वीच पणजी विमानतळावर दाखल झाले.

दिल्लीत कोरोना प्रादुर्भाव वाढला असून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. शहरात नवे निर्बंध देखील केजरीवाल सरकारकडून लागू करण्यात आले आहेत. सोनिया यांना यापूर्वी जुलै महिन्यात प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या सप्टेंबर महिन्यात वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या.

दुसरीकडे राहुल यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वारस्य न दाखवल्यामुळे काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर काँग्रेसचा विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतही पराभव झाल्यामुळे काँग्रेस पक्षातही विरोधाचे वारे वाहत आहेत.