सलमान खानचे संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन


कोरोनाचा जोर गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याचे वाटत असतानाच आता कोरोना पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या घरी आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. सलमान खानच्या घरातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून सलमानच्या ड्रायव्हरचाही यात समावेश आहे.

कोरोनाबाधित घरातील दोन कर्मचारी आढळल्यानंतर सलमानने स्वत:ला आयसोलेट केले आहे. संपूर्ण खान कुटुंबही क्वारंटाइन झाले आहे. सध्या ‘बिग बॉस’चा 14 व्या सीझनचे सलमान खान सूत्रसंचालन करत आहे. अशात येत्या एपिसोडमध्ये तो दिसणार की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.