नितीन नांदगावकरांनी केली मुंबईतील कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी


मुंबई – शिवसेनेचे डॅशिंग नेते अशी ओळख असणाऱ्या नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचे नाव बदला अशी मागणी केली आहे. दरम्यान शिवसेनेचे नांदगावकर यांच्या मागणीला समर्थन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान कराची पाकिस्तानात असल्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होत असल्याचे नितीन नांदगावकर यांनी म्हटले आहे. यामुळेच नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्सचं नाव बदलावे, अशी मागणी केली आहे.

संपूर्ण देशात कराची स्वीट्सची पसरलेली फूड चेन आहे. कराची स्वीट्सची उत्पादने विकणारे अनेक आऊटलेट्स साधारणपणे प्रमुख शहरे आणि महानगरांमध्ये आहेत. कराची बेकरीचे मुंबईतही अनेक ठिकाणी आऊटलेट्स आहेत. नितीन नांदगावकर यांनी या बेकरीच्या नावातील कराची या शब्दावर आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईतील कराची बेकरीच्या सगळ्याच आऊटलेट्सना त्यांनी इशारा दिला आहे. नाव बदला किंवा कराची हा शब्द काढून टाकावा अशीही मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. कराची नावाने कोणतेही व्यवसाय मुंबई आणि महाराष्ट्रात चालणार नाहीत. यामुळे पाकिस्तानला तुम्ही एक प्रकारे पाठिंबा देत असल्याचे निदर्शनास येते. महाराराष्ट्रात रहायचे असेल तर असे नाव चालणार नसल्याचे नितीन नांदगावकर यांनी म्हटले आहे.