अक्षय कुमारने युट्युबर विरोधात ठोकला 500 कोटींचा मानहानीचा दावा


संपूर्ण देशभरात बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण चांगले गाजले. बॉलिवूडमधील ड्रॅग्ज रॅकेटही या प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आले. तसेच अनेक दिग्गज कलाकारांची नावे देखील या संदर्भात समोर आल्यामुळे संपूर्ण मिडियाने देखील या प्रकरणाला चांगलेच उचलून धरले. यात रोज नवनवीन बातम्या प्रसारमाध्यमांपासून सोशल मिडियावर देखील कानावर येऊ लागल्या. यात अनेक अफवा देखील पसरल्या. यात सुशांतच्या प्रकरणात अक्षय कुमारविरोधात चुकीची माहिती पसरवणा-या एका युट्यूबर विरोधात कडक पावले उचलत त्याच्याविरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

राशिद सिद्दीकी असे या युट्यूबरचे नाव आहे. आपल्या आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये त्याने असा दावा केला होता की, अक्षय कुमारने रिया चक्रवर्ती हिला कॅनडाला जाण्यास मदत केली होती. यासंदर्भात मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार युट्यूबर राशिदने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अक्षय कुमारची रियाला मदत होती. तिला देशातून बाहेर कॅनडाला पाठविण्यात अक्षयने मदत केली होती, असे यात म्हटले आहे.

अक्षय कुमारने याप्रकरणी ही खूपच धक्कादायक माहिती असून एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी देखील बातचीत केली होती. ज्यानंतर अक्षयने या युट्यूबर विरोधात कडक पावले उचलली आहेत. या संपूर्ण प्रकरणात त्याने राशिदवर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

FF न्यूज नावाचे युट्यूब चॅनल युट्यूबर राशिद सिद्दीकी चालवतो. रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत बातम्या देऊन राशिदने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 15 लाखांची कमाई केली आहे. मात्र आता आपल्या या व्हिडिओ घेऊनच तो अडचणीत आला आहे.