झुकेरबर्गला मागे टाकत मस्क बनले जगातील तिसरे श्रीमंत

फोटो साभार बिझिनेस इनसायडर

इलेक्ट्रिक कार टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याला मागे टाकून जगात श्रीमंताच्या यादीत तिसरे स्थान मिळविले आहे. नुकतेच त्यांच्या स्पेस एक्स मधून चार अंतराळवीर अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचले आहेत. त्यामुळे सोमवारी टेस्लाचा शेअर १५ टक्क्यानी वाढला असे समजते.

ब्लूमबर्ग बिलीनेअर्स तर्फे मंगळवारी टेस्लाचा शेअर आणखी ८.२ टक्क्यांनी वाढून कंपनीचे मुल्य १०९.७ अब्ज डॉलर्सवर गेल्याचे म्हटले आहे. यावर्षी मस्क यांची संपत्ती ८२.२ अब्ज डॉलर्सवर गेली असून जगातील ५०० श्रीमंत व्यक्ती यादीत ही वाढ सर्वाधिक असल्याचे समजते.

दरम्यान एलन मस्क यांना शनिवारी करोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आली आहे. त्यांना किंचित सर्दीचा त्रास होत होता. याच दिवशी स्पेस एक्स्प्लोरेशन टेक्नोलॉजी कार्पोरेशन निर्मित वाहनातून चार अंतराळवीर अंतराळा स्थानकावर रवाना झाले होते.