बेनझीर कन्या बख्तावतचा साखरपुडा, पाळावे लागणार हे नियम

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो व माजी राष्ट्रपती असीफ जरदारी यांची कन्या बख्तावत भुट्टो झरदारी हिचा साखरपुडा २७ नोव्हेंबर रोजी बिलावत हाउस मध्ये साजरा होत असून त्यासाठी निमंत्रणे रवाना झाली आहेत. विशेष म्हणजे निमंत्रितांना या कार्यक्रमाला उपस्थित राहताना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे असे समजते.

यातील पाहिला नियम म्हणजे पाहुणे बिलावल हाउस मध्ये मोबाईल नेऊ शकणार नाहीत. त्यांना गेटवर मोबाईल ठेऊन आत प्रवेश करता येईल. दुसरे म्हणजे कुणीही निमंत्रित बिलावल हाउस मध्ये एकमेकांचे अथवा समारंभाचे फोटो काढू शकणार नाहीत किंवा व्हिडीओ शुटींग करू शकणार नाहीत. घरातील स्टाफ फोटो काढून नंतर ते पाहुण्यांना देणार आहेत.

साखरपुड्याच्या अगोदर प्रत्येक निमंत्रितांनी एक दिवस आधी करोना टेस्ट करून घ्यायची असून त्याचा रिपोर्ट पाठवायचा आहे. ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे अशांनाच कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे.

बख्तावतचा साखरपुडा अमेरिकेतील व्यावसायिक युनूस चौधरी यांचा मुलगा मेहमूद यांच्या बरोबर होत आहे. हे कुटुंब अमेरिकेचे रहिवासी आहे. बख्तावरने पाकिस्तान मध्ये अनेक जुन्या प्रथांविरुद्ध आवाज उठविला आहे. रमजान मध्ये रोजा पाळताना तहान लागल्यास पाणी पिणे हा गुन्हा असून त्यासाठी शिक्षा दिली जाते. बख्तावरने या प्रथेविरुद्ध आवाज उठविताना दहशतवादी खुलेआम फिरतात आणि लोकांना मात्र शिक्षा दिली जाते असे विधान केले होते. तिला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत असे समजते.