पंतप्रधान मोदीनी केला जो बायडेन यांना फोन

फोटो साभार झी न्यूज

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष जो बायडेन यांना फोन करून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते. यात करोना नियंत्रणापासून जलवायू परिवर्तन पर्यंत अनेक विषय समाविष्ट होते. दोन्ही देशातील द्विपक्षीय सहकार्य कायम राहील असे आश्वासन बायडेन यांनी यावेळी मोदींना दिल्याचे समजते.

यावेळी मोदींनी चीन विरुद्ध हिंद प्रशांत क्षेत्रात दोन्ही देशात सुरु असलेल्या सहकार्य कराराची जाणीव बायडेन यांना करून दिली आणि बायडेन यांनी याबाबत पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या दोन नेत्यात बायडेन यांची अध्यक्षपदावर निवड झाल्यावर पहिलीच चर्चा झाली. या संदर्भात मोदी यांनी ट्विट करून बायडेन यांच्याबरोबर फोनवरून बोलणे झाल्याचे आणि त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्याचे म्हटले आहे.

मोदी यांनी उपराष्ट्रपती निवडून आलेल्या कमला हॅरीस यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणतात, ‘तुमचे यश भारतीय आणि अमेरिकी समाजाला गर्व वाटेल आणि प्रेरणा मिळेल असे आहे. भारत अमेरिका संबंध अधिक मजबूत होण्यातील हा महत्वाचा स्त्रोत आहे. मोदी यांनी यावेळी त्यांनी २०१४ आणि २०१६ मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्यात बायडेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या आठवणी शेअर केल्या आहेत.