टीम इंडियाचा नवा किट प्रायोजक- एमपीएल स्पोर्ट्स गेमिंग कंपनी

फोटो साभार झी न्यूज

बीसीसीआयने गेमिंग कंपनी एमपीएल स्पोर्ट्सला टीम इंडियाची नवी किट प्रायोजक कंपनी म्हणून निवडले असून ही कंपनी बीसीसीआयची अधिकृत व्यावसायिक भागीदार झाली आहे. त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. टीम इंडियाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एमपीएल टीम इंडियाला किट पुरविणार आहे. बीसीसीआयने एमपीएल स्पोर्ट्स बरोबर तीन वर्षाचा करार केला आहे.

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली या संदर्भात म्हणाला, नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ पर्यंत भारतीय पुरुष, महिला क्रिकेट टीम तसेच १९ वर्षाखालील राष्ट्रीय टीम साठी ही कंपनी किट पुरविणार आहे. हा करार म्हणजे नवीन युगाची सुरवात असून उच्च गुणवत्तेचे सामान भारतीय क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचविणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.