कोविड १९ झाला एक वर्षाचा

फोटो साभार एसीटी अलायन्स

जगभरात दहशत माजाविलेला करोना कोविड १९ विषाणू मंगळवारी एक वर्षाचा झाला. १७ नोव्हेंबर २०१९ मध्ये या विषाणूची पहिली केस चीनच्या हुबेई भागातील वुहान या शहरात आढळली होती आणि आज या विषाणूने जगभरातील ५ कोटी ५४ लाख लोकांना त्याच्या विळख्यात जखडले आहे. या विषाणूने मरण पावलेल्यांची संख्या १३ लाख ३४ हजारावर गेली आहे. आता अनेक देश या विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत.

चीन कडून कोविड १९ चा पाहिला संक्रमित १७ नोव्हेंबर रोजी आढळला असल्याचा इन्कार केला आहे. पण  साउथ चायना मॉर्निंग पोस्ट मध्ये मार्च मध्ये छापल्या गेलेल्या एक रिपोर्ट मध्ये १७ नोव्हेंबर या तारखेचा उल्लेख आहे. त्यात ५५ वर्षाच्या एका इसमाला या विषाणूची लागण झाल्याचे म्हटले गेले आहे. चीन कडून मात्र डिसेंबर मध्ये कोविडची पहिली केस सापडल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेने सुरवातीपासूनच चीनच्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार केला गेल्याचे आणि जाणून बुजून किंवा अपघाताने हा विषाणू पसरल्याचे आरोप केले आहेत.