एकच दिवसात २१ जणांना दिली फाशी

इराक मध्ये दहशतवाद विरोधी कायद्यानुसार दोषी ठरविण्यात आलेल्या २१ लोकांना सोमवारी एकचवेळी फाशी दिली गेली. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संखेने लोकांना फासावर चढविले गेल्यामुळे मानवाधिकार संघटना इराक सरकार विरोधात उभ्या राहिल्या आहेत.

इराकच्या नासीरीयाह तुरुंगात २००५ मध्ये दहशतवाद विरोधी कायद्यानुसार दोषी ठरविल्या गेलेल्या २१ जणांना सोमवारी फाशी दिली गेली मात्र त्यांनी कोणती दहशतवादी कृत्ये केली होती त्याचा तपशील दिला गेलेला नाही. विशेष म्हणजे या एकच जेल मध्ये फाशीची शिक्षा सुनावले गेलेले दोषी ठेवले जातात. सद्दाम हुसेन यांची सत्ता असताना शेकडो लोकांना व माजी अधिकाऱ्यांना येथे फासावर लटकविले गेले होते. या देशात फाशीची शिक्षा देण्यास मंजुरी आहे.

२०१७ च्या शेवटी इस्लामिक स्टेट म्हणजे आयएसआयएस (इसीस)ने इराकवर विजय मिळविल्यावर जिहादी समूहाने त्यांच्यावर निष्ठा व्यक्त केली होती आणि त्यानंतर शेकडो नागरिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. मात्र फाशी देण्यास राष्ट्रपतीची मंजुरी लागते त्यामुळे त्यातील काही जणांनाच फाशी दिले गेले होते. सोमवारी फाशी दिल्या गेलेल्या २१ जणांच्या शिक्षा अमलबजावणीला राष्ट्रपती बरहाम सालीह यांनी मंजुरी दिली होती असे समजते.

इराक मध्ये २०१९ या वर्षात १०० जणांना फाशी दिले गेले आहे. मृत्युदंड सुनावणाऱ्या देशाच्या यादीत इराक जगात पाच नंबरवर आहे.