प्रत्येक सिरीजपूर्वी अनवाणी मैदानावर येणार ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू

फोटो साभार झी न्यूज

आयपीएलचा दंगा संपल्यावर आता सर्व क्रिकेटरसिकांना वेध लागले आहेत ते टीम इंडियाच्या ऑस्टेलिया दौऱ्याचे. दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूनी प्रत्येक सिरीजपूर्वी स्वदेशी संस्कृतीला मानवंदना देण्यासाठी मैदानावर अनवाणी येऊन रिंगण करून उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे कसोटी व वनडे सिरीजचा उपकप्तान पॅट कमिन्सने सांगितले. त्याची सुरवात भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन डे सामन्यापासून केली जाणार आहे.

जगभरात वर्णद्वेष विरुद्ध छेडल्या गेलेल्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर ‘ आंदोलनाला समर्थन देण्यासाठी इंग्लंड दौऱ्यात टीमने गुढघ्यावर बसण्याच्या केलेल्या आव्हानाला प्रतिसाद न दिल्याबद्दल ऑस्टेलिया टीम वर वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू मायकेल होल्डिंगने सडकून टीका केली होती. त्यानंतर कमिन्सने हा निर्णय जाहीर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाची वर्णद्वेष आंदोलनाला पाठींबा देण्याची पद्दत वेगळी असू शकते. आमच्या टीमला मैदानात अनवाणी उभे राहण्याची पद्धत वर्णद्वेष समस्या निपटून काढण्याचा प्रयत्न म्हणून सर्वश्रेष्ठ वाटते. ते अधिक सोपे आहे. फक्त खेळापुरते नाही तर आम्ही नेहमीच वर्णद्वेष विरोधी आहोत. आम्ही आमच्या पातळीवर वर्णद्वेष संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न करत आहोत.