विराटचे समर्थन करताना काँग्रेस नेत्याने पातळी सोडली


नवी दिल्ली – सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच चर्चेत आहे. भारतीय चाहत्यांना टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात असलेल्या कोहलीने सिडनीतून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीने या शुभेच्छा देत असताना फटाके न फोडण्याचे आवाहन केले. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर काही नेटकऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली.


आपली पातळी सोडत काही नेटकऱ्यांनी याप्रकरणी विराटची पत्नी अनुष्का शर्मावरही अश्लील टीका करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर रविवारी काही नेटकऱ्यांनी #अनुष्का_तेरा_कुत्ता_संभाल असा हॅशटॅगही ट्रेंड केला. चहुबाजूंनी विराट आणि अनुष्कावर टीकेचा भडीमार होत असताना भाजपचे माजी खासदार आणि काँग्रेसचे सध्याचे प्रवक्ते डॉ. उदीत राज यांनी विराटची बाजू घेतली आहे. पण त्याची बाजू घेताना त्यांची देखील पातळी घसरली आणि त्यांनी अनुष्काला तिचा कुत्रा विराटला संभाळायची गरज नसल्याचे म्हटले आहे.