अशा प्रकारे बनवा एटीएमसारखे सारखे दिसणारे आधार PVC card


नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकासाठी सध्याच्या घडीला आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. आधार कार्ड घरातील काही आर्थिक कामे किंवा सरकारी कामांसाठी आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड अशावेळी सुरक्षित असणे आवश्यक आहे. UIDAI ने आता हिच बाब लक्षात घेता एटीएम प्रमाणे दिसणारे आधार PVC card जारी केले आहे. केवळ 50 रुपयात हे कार्ड तुम्ही बनवू शकता. त्यासाठीची माहिती आज माझा पेपरच्या वाचकांना देणार आहोत.

यासंदर्भात UIDAI ने अशी माहिती दिली आहे की, तुम्ही केवळ 50 रुपयात आधार PVC card बनवू शकता. हे कार्ड तुम्ही ऑनलाइन देखील ऑर्डर करू शकता. ऑर्डर केल्याच्या 5 दिवसानंतर कार्ड संबंधित विभागाकडून ते तुमच्या घरी पाठवले जाईल. पीव्हीसी कार्ड प्रिंट करण्यासाठी 50 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

आधार PVC card ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर याठिकाणी ‘My Aadhaar’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करावे लागेल. तुम्हाला याठिकाणी 12 अंकी आधार कार्ड क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्यूअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट आयडी टाकावा लागेल. त्यानंतर सिक्योरिटी कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला ओटीपी एंटर करा. यानंतर आधार पीव्हीसी कार्डाचा तुम्हाला प्रीव्ह्यू दिसेल.

त्यानंतर खाली देण्यात आलेल्या पेमेंट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. पेमेंट पेजवर गेल्यानंतर तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसी कार्डाची प्रोसेस पूर्ण होईल. ही प्रोसेस जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर 5 दिवसांच्या आतमध्ये संबंधित विभागाकडून भारतीय डाक विभागाकडे कार्ड पाठवले जाईल. पोस्टाच्या माध्यमातून कार्ड तुम्हाला घरपोच मिळेल.