बिग डिल; आगामी चित्रपटासाठी अक्षयने घेतले 100 कोटी रूपये मानधन


बॉलीवूडमधील सर्वात व्यस्त कलाकारांच्या यादी खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार अव्वल स्थानी आहेच. त्याचबरोबर त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला जाणार आहे. कारण आगामी दिवसात त्याची सर्वात महागडा अभिनेता अशी गणती होणार आहे. अक्षयने आगामी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्ही नक्कीच चक्रवाल. कारण या चित्रपटासाठी अक्षयने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचा एक कॉमेडी चित्रपट अक्षयने साईन केल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. या चित्रपटाची निर्मिती जॅकी व वासू भगनानी करत असून या चित्रपटासाठी अक्षयला तब्बल 100 कोटी मानधन देण्यात आली माहिती समोर येत आहे.

यासंदर्भातील वृत्त बॉलिवूड हंगामाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाच या कॉमेडी चित्रपटासाठी अक्षयने होकार दिला होता. 35 ते 40 कोटी रूपये या आगामी चित्रपटाचा प्रॉडक्शन बजेट आहे. पण 150 कोटी रूपयांवर एकूण बजेट पोहोचला आहे. कारण अक्षय कुमारलाच केवळ मानधनापोटी 100 कोटी रूपये देण्यात येणार आहे. अक्षयने केवळ 45 दिवसांत हा चित्रपट पूर्ण केल्यास चित्रपटात संभाव्य तोट्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिक राईट्स विकून चित्रपटावर लागलेले अर्धे पैसे वसूल होतील. बाकीचे अर्धे पैसे थिएटरमधून निघतील. पुढील वर्षी जुलैच्या जवळपास या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल आणि चित्रपट ऑगस्टच्या अखेरपर्यंत बनून तयार होईल.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारला मुदस्सर अजीजच्या चित्रपटासोबतच एक सोशल ड्रामा आणि एक्शन थ्रिलर चित्रपटाची देखील ऑफर देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय कुमारकडे जवळपास एकूण १० चित्रपट आहेत. ज्यांचे शूटिंग २०२१ पर्यंत पूर्ण होईल.

अक्षयने काही दिवसांपूर्वीच रंजीत तिवारीचा स्पाई थ्रिलर ‘बेल बॉटम’चे शूटिंग केले आहे आणि सध्या तो यशराज बॅनरचा चित्रपट ‘पृथ्वीराज’मध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार पृथ्वीराजनंतर दिग्दर्शक आनंद एल रायचा अतरंगी रे चे शूटिंग करणार आहे आणि त्यानंतर साजिद नाडियादवाला बॅनरखाली निर्मिती होणा-या ‘बच्चन पांडे’च्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. बच्चन पांडेनंतर तो एकता कपूर निर्मित एका अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.