बीड अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी


बीड – सत्र न्यायालयाने बीड येथे तरुणीवर अॅसिड हल्ला करुन तिला पेट्रोल टाकून जाळून मारल्याबद्दल अटकेत असलेला आरोपी अविनाश राजुरे याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी फरार आरोपी राजुरे याला शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर २४ तासांतच नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून अटक केली होती.

शनिवारी बीड तालुक्यातील येळंबघाट येथे २२ वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. याची खबर मिळताच पोलिसांना पीडित तरुणीला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, या तरुणीचा रविवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली होती.