व्हॉट्सअॅपमध्ये झाला ६१ नव्या वॉलपेपरचा समावेश


मुंबई – व्हॉट्सअॅपने नेहमीप्रमाणे अॅप अपग्रेड केले असून नव्या ६१ वॉलपेपर्सचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे चॅटिंग करताना युजर्सना वेगळाच अनुभव मिळू शकणार आहे. सध्या आपल्या बीटा युजर्ससाठी हे वॉलपेपर फिचर व्हॉट्सअॅपने आणले आहे.

याबाबतची माहिती देताना व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने म्हटले की, आपल्या अँड्रॉईड बीटा युजर्ससाठी व्हॉट्सअॅपने अॅडव्हान्स्ड वॉलपेपर नावाचे फीचर लॉन्च केले आहे. आपल्याला आवडेल अशा पद्धतीने युजर्स चॅटिंगच्या बॅकग्राउंडचे वॉलपेपर बदलू शकतात. यासाठी आता त्यांना ६१ नव्या वॉलपेपर्सचे पर्याय मिळू शकतील. व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने ट्विटसोबत वॉलपेपर्सच्या डिझाईनची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. याद्वारे नवे वॉलपेपर कसे दिसतात हे पाहता येईल. यात विशेष म्हणजे युजर्स वॉलपेपरच्या ओपेसीटीमध्ये देखील बदल करु शकतात.

युजर्स ३२ नवे ब्राइट वॉलपेपर्स, २९ नवे डार्क वॉलपेपर्स, कस्टम वॉलपेपर आणि सॉलिड कलरमध्ये आपल्या हिशोबाने निवडू शकतात. जर आपण जुना वॉल पेपर निवडला तर आपण व्हॉट्सअॅप अर्काईव्ह हा पर्याय निवडू शकता. आपण जर सॉलिड रंगांना नव्या वॉलपेपरप्रमाणे सेट करु इच्छित असाल तर आपण याला व्हॉट्सअॅप डुडलवर घेऊ शकता. व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने सांगितले आहे की, याला सध्या बीटा युजर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहे. लवकरच त्याचे स्टेबल व्हर्जन सर्वांसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.