अमेरिका आणि इस्राईलने एकत्रितपणे केला अल कायदाच्या दहशतवाद्याचा खात्मा


वॉशिंग्टन – अमेरिका आणि इस्त्रायल यांनी यावर्षी इराणमध्ये अल-कायदाच्या एका दहशतवाद्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा खात्मा करण्यासाठी एकत्र काम केले. ट्रम्प प्रशासनाकडून तेहरानवर दबाव वाढत असताना अशा वेळी या दोन्ही सहयोगी देशांनी हे गुप्त अभियान राबवले होते.

चार माजी आणि विद्यमान अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अबू मोहम्मद अल-मसरी याला ऑगस्टमध्ये इराणच्या राजधानीत ठार मारण्यात आले. यातील दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की अमेरिकेने इस्राईलच्या अधिकाऱ्यांना अल-मसरी कोठे मिळेल याची माहिती दिली, तर इस्राईलच्या एजंटांनी हे काम पार पाडले.

इतर दोन अधिकाऱ्यांनी अल-मसरीच्या हत्येची पुष्टी केली, पण त्यांना अधिक माहिती देता आली नाही. ७ ऑगस्टला तेहरानमध्ये अल-मसरीचा मृत्यू झाला होता. 7 ऑगस्ट 1998 रोजी नैरोबी, केनिया, दार एस सलाम आणि टांझानिया येथील अमेरिकन दूतावासांवर बॉम्ब हल्ले केले होते.

असे मानले जाते की अल-मसरी या हल्ल्यांच्या कटात सहभागी होता आणि एफबीआयच्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होता. अल-कायदाला अल-मसरीच्या हत्येमुळे मोठा धक्का बसला आहे आणि पश्चिम आशियात संघटनेचे नेते यमन अल-जवाहिरीबद्दलच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर ही बातमी समोर आली आहे. याच दहशतवादी संघटनेने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत हल्ले केले.