पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत मनसे प्रमुखांची दिवाळी


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिटनेसकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष देताना दिसत आहे. राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कात टेनिस कोर्टात खेळताना दिसून येत आहेत. राज ठाकरे नेहमीप्रमाणे टेनिस खेळायला गेले असताना राज ठाकरेंकडे फोटो काढण्याची शिवाजीपार्क परिसरात काम करणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी विनंती केली होती. राज ठाकरेंनीही यावेळी त्यांच्या विनंतीचा मान राखत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून दिलखुलासपणे फोटो काढला.

याबाबत मनसे नेते सचिन मोरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. माणूसकी जपणारा संवेदनशील नेता, असे सचिन मोरे यांनी त्यात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे टेनिस खेळण्यासाठी जातात. याचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटोही व्हायरल होत आहे. राज ठाकरेंसह त्यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरेही टेनिस खेळताना दिसतात.
https://www.facebook.com/sachin.m.more.16/posts/3826169564069251
मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल नेहमी प्रमाणे शिवाजी पार्कात टेनिस खेळायला आले होते. शिवाजीपार्क परिसरात त्यावेळी काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केल्यानंतर राज यांनीही आपले हात या सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ठेवत दिलखुलासपणे फोटो काढला. या फोटोच्या माध्यमातून मुंबई दिवसरात्र स्वच्छ ठेवणाऱ्या या सफाई कर्मचारीऱ्यांना खऱ्या अर्थांने कोविड योध्दा असलेल्याचे प्रशस्तीपत्रक दिवाळीत मिळाले असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.