आरोप झाले ठाकरे कुटुंबावर आणि मिरच्या लागल्या नाईक कुटुंबियांना ; निलेश राणे


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबाने जमीन विकल्याची कागदपत्रे दाखवून व्यवहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना नाईक कुटुंबियांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही तरी मोठी गोष्ट आपण जनतेसमोर आणत असल्याचा किरीट सोमय्यांचा अविर्भाव आहे. पण लपवण्यासारखे त्या जमीन व्यवहारात काहीच नाही. आमची जमीन आम्ही कोणाला विकू शकत नाही का? कोणाला जमीन आम्ही विकावी, हा आमचा प्रश्न असल्याचे अक्षता आणि आज्ञा नाईक म्हणाल्या.


यावरून आता पुन्हा एकदा ठाकरे आणि नाईक कुटुंबियांवर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. ठाकरे कुटुंबावर आरोप झाले आणि, नाईक कुटुंब उत्तर देत आहे; मोठा झोलझाल, फारच जवळचे संबंध दिसत असल्याचे निलेश यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निलेश राणे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. नाईक कुटुंबाला इतकी मिरची लागली की आरोप झालेत ठाकरे कुटुंबावर आणि उत्तर देतायत नाईक कुटुंब. मोठा झोलझाल दिसतोय. फारच जवळचे संबंध दिसतायत, असे म्हटले आहे.