जो बायडेन यांच्या चमूमध्ये २० हून अधिक भारतीयांना स्थान


वॉशिंग्टन – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण होत आली असून अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा म्हणून कमला हॅरिस हे शपथ घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. यादरम्यान, अमेरिकेत सत्तेतील हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जो बायडेन यांनी यामध्ये आपल्या ट्रांझिशन टीममध्ये भारतीय वंशाच्या २० व्यक्तींना स्थान दिले आहे.

आपली एक नवी रिव्ह्यू टीम अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तयार केली आहे. ट्रांझिशन टीम असेही याला म्हणतात. या माध्यमातून निवडणूक जिंकल्यानंतर बायडेन हे २० जानेवारी रोजी शपथ घेतल्यानंतर कार्यभार सांभाळतील . एकूण ५०० जणांचा या टीममध्ये समावेश आहे.

भारतीय वंशाच्या तीन व्यक्तींना जो बायडेन यांनी आपल्या रिव्ह्यू टीमच्या लीडर्समध्ये समावेश केला आहे, तर या टीममध्ये अन्य २० जणांचा समावेश केला आहे. अमेरिकेतील सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेत या सर्व भारतीय वंशांच्या व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावतील.

जे प्रमुख तीन भारतीय वंशाचे चेहरे बायडेन यांच्या या टीममध्ये आहेत त्यांच्यामध्ये राहुल गुप्ता, अरुण मजुमदार आणि किरण आहुजा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अतमन त्रिवेदी, अनीश चोप्रा, अऱुण वेंकटरमण, राज नायक, शीतल शाह यांच्यासारख्या अन्य २० जणांच्या टीममध्ये आहेत.

बायडेन यांचे प्रशासनसुद्धा यापूर्वी जनतेत चर्चेचा विषय बनला होता. तसेच भारतीय वंशाच्या व्यक्तींची बायडेन यांच्या टीममध्ये भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असेही मानण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काही तासांनंतर बायडेन यांच्या गटाकडून सांगण्यात आले की, बायडेन सरकारचे पहिले प्राधान्य हे कोरोनाला रोखण्याचे असेल. यासाठी बायडेन टास्क फोर्सची निर्मिती करणार आहेत. पण डॉ. विवेक मूर्ती यांच्याकडे सध्या या टीमची जबाबदारी देण्यात आली आहे.