जाणून घ्या देशभरात 1 डिसेंबरपासून ‘लॉकडाउन’ पुन्हा लागू होणाऱ्या व्हायरल मेसेज मागील सत्य


नवी दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात सोशल मीडियावर बनावट मेसेजचा सुळसुळाट झाला होता. हे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. त्याचबरोबर या मेसेजच्या माध्यमातून अनेक फेक दावे केले जात होते. सध्या असाच एक मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. देशभरात 1 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात येईल, असा दावा व्हायरल ट्विटमध्ये करण्यात आला आहे.


सरकारने हा निर्णय कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे घेतला आहे. पण हे ट्विट पीआयबीने नाकारले आहे. वास्तविक, पीआयबीने या व्हायरल ट्विटच्या सत्यतेची चौकशी केली आणि तपासणीनंतर हे ट्विट बनावट असल्याचे घोषित केले आहे. सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे पीआयबीने नमूद केले आहे.