सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात कारवाई करण्याचे आदेश


पुणे – स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल होणार आहे. अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने रिपलब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना न्या. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत नाराजी व्यक्त करत त्यासंदर्भातील काही ट्विट्सही केली. पुण्यातील काही वकिलांनी ज्यानंतर अॅटर्नी जनरल यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर आता कुणाल कामराविरोधात खटला दाखल करण्याचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना हंगामी जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयावर गोस्वामी यांना जामीन न दिल्याबद्दल ताशेरे ओढले. दरम्यान अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने काही वादग्रस्त ट्विट्स केली होती. आता पुण्यातील दोन वकिलांनी याच प्रकरणात थेट भारताच्या अ‍ॅटर्नी जनरलकडे यासंदर्भात तक्रार केली असून संबंधित प्रकरणामध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कुणालवर कारवाई करण्याची मागणी या वकिलांनी केली.