मेलानिया यांना घटस्फोटानंतर settlement म्हणून मिळू शकते ‘एवढी’ रक्कम


वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना नुकत्याच अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण, ट्रम्प यांनी यातही सरळमार्गी त्यांच्या पराभवाचा स्वीकार केला नाही. या प्रकरणाला न्यायालय ते अगदी हिंसाचार अशी एकंदर किनार मिळाल्याचे पाहायला मिळाले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाने हुलकावणी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या खासगी आयुष्यतही सध्या एक वादळ आल्याची चर्चा जोर पकडत आहे. पत्नी मेलानियापासून विभक्त होण्याचे हे वादळ असून डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी त्यांना घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी एकमेकांशी लग्नगाठ बांधी होती. ट्रम्प आणि मेलानिया यांना एक अपत्य आहे.

कायदे तज्ज्ञांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांना मेलानिया यांनी घटस्फोट दिल्यास घटस्फोटासाठीचा समझोता म्हणून त्यांना 68 मिलियन डॉलर एवढी मोठी रक्कम मिळू शकते. व्हाईट हाऊसशी संलग्न अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ट्रम्प कधी आपल्या कार्यालयातून बाहेर पडतात आणि कधी त्यांना घटस्फोट देतात याची मेलानिया प्रतीक्षा करत आहेत. मेलानिया यांनी ते कार्यालयीन कामकाजात असतानाच हा निर्णय़ घेतला तर, त्यावर ट्रम्प शांत राहणाऱ्यांपैकी नसल्याचा मोठा खुलासा करण्यात आला आहे. तेव्हा आता या नात्यामध्ये नेमका काय ट्विस्ट येणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.