तुम्हाला माहिती आहे का धोनीच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा


मैदानावर आणि मैदानाबाहेरही आपला खेळ आणि स्वभावामुळे क्रिकेट चाहत्यांच्या मनावर निवृत्तीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार अर्थात कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी राज्य करतो. भलेही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत थोडी देखील कमी झालेली नाही. आपल्या अनुकरणीय अंदाजामुळे कायम त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीच्या लोकप्रियतेत तसुभरही कमतरता झालेली नाही. त्याचबरोबर त्याच्या ब्रँड व्हॅल्युतही कोणत्याही प्रकारची घट झालेली नाही. सध्या मुंबईत आपल्या नव्या घराच्या निर्मितीवर लक्ष देणारा धोनी एका वर्षात नक्की किती कमाई करतो, याची माहिती आपल्यापैकी अनेकांना नसेल. पण त्याच्या वार्षिक कमाईचा आकडा ऐकल्यानंतर तुमचे डोळे नक्की चक्रावतील. त्याच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा CA Knowledgeने सांगितला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र सिंह धोनीचे वार्षिक उत्पन्न तब्बल ७६० कोटी रुपये एवढे आहे.

धोनीला क्रिकेटव्यतिरिक्त ब्रँड एन्डॉर्समेंट, जाहिराती या माध्यमातून असंख्य ऑफर मिळतात. धोनी यातूनच काही ऑफर्सची निवड करत जाहिराती वगैरेच्या ऑफर स्वीकारतो. ज्यामुळे त्याच्या संपत्तीत मोठ्या फरकाने वाढ होते. दरम्यान, यंदाच्या वर्षी दुबईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात माहीला अपेक्षित सूर गवसला नाही. यामुळं काही अंशी क्रिकेटप्रेमींची निराशाही झाली. पण, ती फार काळ टीकू शकली नाही.

त्याचबरोबर धोनी येत्या काळात मुंबईत वास्तव्यास येणार असल्याचेही चित्र सध्या निर्माण झाले आहे. कारण त्याची पत्नी साक्षीने सोशल मीड्यावर पोस्ट केलेले फोटो पाहून याबाबतचा अंदाज लावला जात आहे. तेव्हा आता धोनी खरंच रांचीपासून दूर मुंबईत येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.