योगी आदित्यनाथ यांची खास गिफ्ट – दिवाळी बास्केट

फोटो साभार नवभारत टाईम्स

उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दिवाळीसाठी गिफ्ट म्हणून खास बास्केट देण्याचा निर्णय घेतला असून ही खास बास्केट राष्ट्रपती, सर्व राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि काही निवडक लोकांना देण्यात येणार आहे. या बास्केट मध्ये उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांची खासियत असलेल्या खास वस्तूंचा समावेश केला गेला आहे. यामुळे या वस्तूंना जागतिक ओळख प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे. वन डीस्ट्रीक्ट वन प्रोडक्ट अशी ही योजना असून या उत्पादनांचे प्रमोशन करण्यासाठी दिवाळीची संधी साधली गेली आहे.

या बास्केट मध्ये समाविष्ट वस्तू रोजच्या वापरातील आणि पूजा कार्यात लागणाऱ्या आहेत. गोरखपूरचे सुप्रसिध्द टेराकोटाच्या लक्ष्मी गणेश मूर्ती आणि दिवे, सिद्धार्थनगर मधील कालानमक जातीचा सुवासिक तांदूळ, वाराणसी येथील सिल्क स्टोल, लखनौचे चिकन कुर्ते, मुजफ्फराबादचा स्वादिष्ट आणि रुचकर गुळ, सहारनपुर चे लाकडी कोरीव काम वस्तू, कनोजची अत्तरे, प्रतापगढचे औषधी आवळे, चंदोलीची जरी जरदोसी, मुरादाबादचे ब्रास बाऊल्स आणि प्रयागराजच्या खास बास्केट यांचा यात समावेश आहे.

याशिवाय ब्लॅक पॉटरी फुलदाण्या, आग्रा येथील मार्बल टी कोस्टर, लाकडी पेन स्टँड यांचाही या गिफ्ट मध्ये समावेश असून गिफ्टचे पॅकिंग बहुराष्ट्रीय कंपन्याच्या तोडीस तोड केले गेले आहे.