तुरुंगातून सुटताच अर्णवने उद्धव ठाकरेंंना दिले आव्हान

फोटो साभार लोकसत्ता

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी जामिनावर तळोजा जेल मधून बाहेर येताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. तुरुंगातून बाहेर पडताच थेट न्यूज रूम मध्ये जाऊन अर्णव म्हणाला, तुम्ही स्वतंत्र पत्रकारिता अडवू शकत नाही. ठाकरे, तुम्ही मला खोट्या केसमध्ये अटक केली आणि त्याबद्दल साधी दिलगिरी व्यक्त केली नाहीत. खेळ आता सुरु झाला आहे. मी प्रत्येक प्रादेशिक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरु करणार आहे आणि आंतरराष्ट्रीय मिडिया मध्ये आमचे अस्तित्व आहेच. तुम्ही मला पुन्हा अटक केली तर तुरुंगातून चॅनल सुरु करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही.’

रायगड जिल्ह्यातील तळोजा तुरुंगातून अर्णव याची सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यावर सुटका करण्यात आली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव याला ४ नोव्हेंबर रोजी अटक झाली होती आणि त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर सात दिवसांनी त्याची जामिनावर सुटका झाली. तुरुंगातून सुटताच त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला गराडा घातला. यावेळी अर्णवने ठाकरे तुम्ही हरलात असे ओरडून पोलीस आयुक्त परमजीतसिंग यांच्यावर सुद्धा कडाडून टीका केली.