रशियन चॅनल वन अंतराळात करणार फिल्म शुटींग

फोटो साभार डेली मेल

रशियन चॅनल वन अंतराळात फिल्म शूट करण्याच्या तयारीला लागला आहे आणि या फिल्मसाठी कशी हिरोईन पाहिजे यासाठी जाहिरात दिली गेली आहे. जगभरातील देश अंतराळावर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा करत आहेत त्यात अंतराळात सर्वप्रथम कोणता देश फिल्म शूट करणार या स्पर्धेचीही भर पडली आहे. अमेरिकेच्या नासाने खासगी क्षेत्राला यासाठी संधी दिली असून टॉम क्रुझ याला शुटींग करण्याची परवानगी दिली आहे. पण त्याअगोदर रशियाने पुढचे पाउल टाकून फिल्म शुटींगची तयारी सुरु केली आहे.

चॅनल वनच्या या चित्रपटासाठी दोन महिला कलाकार हव्या आहेत. पैकी एकीची हिरोईन म्हणून तर दुसरीची तिची सहकारी कलाकार म्हणून निवड केली जाणार आहे. त्यासाठी काही अटी आहेत. त्यानुसार पहिली अट म्हणजे महिला कलाकार रशियन हवी. २५ ते ४५ वयोगटातील, १५० ते १८० सेंटीमीटर उंची, ५० ते ७५ किलो वजन, वक्षस्थळांचा आकार ११२ सेंटीमीटर हवा शिवाय गुन्हेगारी रेकॉर्ड नको.

रोस्केस्मोस, चॅनल वन, ओ यलो, ब्लॅक अँड व्हाईट स्टुडीओ मिळून ही फिल्म बनविणार आहेत. त्याचे शुटींग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होणार आहे असे जाहीर केले गेले आहे.