महिलांसाठी घरबसल्या कमाईचे हे ५ सुलभ मार्ग

women
लग्नानंतर कुटुंबियांची इच्छा नसल्याने अथवा बाळंतपणानंतर मुलांच्या जबाबदारीमुळे महिलांना नोकरी करणे शक्य होत नाही. मात्र सध्याच्या काळात मर्यादित उत्पन्नावर घर चालविणे मुश्कील होत आहे. त्यावेळी कमावत्या व्यक्तीला हातभार लावण्यासाठी घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून चांगली कमाई करण्याचे अनेक मार्ग आता उपलब्ध आहेत.
tiffin
मेस अथवा टिफीन – बहुतेक स्त्रिया या स्वयंपाक करण्यात निपुण असतात. अशा महिला टिफीनचा अथवा जागा असल्यास मेस चालविण्याचा व्यवसाय सुरु करु शकतात. जे लोक कामानिमित्त अथवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहतात अशा नोकरदारांना आणि विद्यार्थ्यांना टिफीन अथवा मेस सेवा देऊ शकतात
freelance
फ्रीलान्स रायटींग – ज्या महिलांना लिखाणाची आवड असेल; शैली असेल; चांगले लिहू शकत असतील तर त्या फ्रीलान्स लेखन करू शकतात. एखाद्या वर्तमानपत्राने किंवा मॅगझिनने लिखाण प्रसिद्ध करून एका लेखाला कमीत कमी २०० रुपये दिले; आणि दिवसभरात ३ लेख जरी लिहीता आले; तरी दरमहा १५ ते १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल.
beautician
मेकअप, ब्युटीशियन – मेकअप आणि ब्युटी पार्लरची आवड बहुतेक महिलांना असते आणि त्यांना त्यासार्भात ज्ञानही सहज मिळते. अल्पवाधीचे प्रशिक्षण, थोडेसे भांडवल आणि कल्पकता या भांडवलावर हा व्यवसाय करता येतो.
tuition
शिकवणी – सर्वसाधारणपणे पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतलेल्या, समजावून देण्याची क्षमता आणि न रागावता मुलांना समजेपर्यंत समजावून देण्याचा पेशन्स असलेल्या महिला घरातच अथवा छोट्याश्या जागेत शिकवणी, अर्थात ट्युशन घेऊ शकतात. आपले ज्ञान इतरांना दिल्याने ते कमी न होता वाढते. अद्ययावत राहते. याशिवाय त्यापासून चांगले उत्पन्नही मिळू शकते. अर्थात हा पर्याय केवळ महिलांनाच नव्हे; तर पुरुषांनाही उपयुक्त आहे.
hobby-classes
छंद वर्ग – अनेक महिलांना विद्यार्थी दशेपासून शिवण, वीणकाम, रुटीनपेक्षा वेगळ्या प्रकारचे नावीन्यपूर्ण पदार्थ बनविणे, चित्रकला, बोन्साय, संगीत, नृत्य अशा अनेक प्रकारचे छंद जोपासणे आवडते. त्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ही कला इतरांना शिकविणे हा मोठा व्यवसाय होऊ शकतो. अशा व्यवसायाने आपला छंद जोपासण्याची संधी, जोडीला आकर्षक कमाई आणि इतरांना या कलेचे प्रशिक्षण देऊन कलेची सेवा केल्याचे समाधान; असा तिहेरी फायदा मिळू शकतो.

Leave a Comment