सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली फटाके बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका


नवी दिल्ली – कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या फटाक्यांवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आम्ही सण महत्त्वाचे आहेत, हे समजू शकतो. पण सध्या जनतेचे आयुष्यच धोक्यात असल्यामुळे जीवन वाचवण्यापेक्षा सध्या दूसरी कोणतीच मूल्ये मोठी असू शकत नसल्याचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

गुरुवारी पाच नोव्हेंबरला कोलकाता उच्च न्यायालयाने काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला. फटाके विक्रीवरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घातली. एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता.