केंद्राचा मोठा निर्णय, डिजिटल मीडिया आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या निगरानी खाली


नवी दिल्ली – देशातील डिजिटल मीडिया आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आले आहे. याबाबत केंद्र सरकारने बुधवारी आदेश जारी केला. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला.

आता डिजिटल मीडियाही माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असेल. आदेशानुसार आता ऑनलाईन चित्रपट, दृकश्राव्य कार्यक्रम आणि ऑनलाईन बातम्या व चालू घडामोडीवरील माहिती आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार आहेत.

हा शासकीय आदेश तातडीने अंमलात आला आहे. आदेशानुसार, ऑनलाइन सामग्री प्रदात्यांद्वारे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलेले चित्रपट आणि दृकश्राव्य कार्यक्रम बातम्या आणि वर्तमान सामग्री मंत्रालयाच्या अंतर्गत येतील.