स्वस्त आणि खात्रीशीर देशी फेलुदा कोविड चाचणी किट परदेशातही वापरली जाणार

फोटो साभार इंडिया टुडे

करोनाच्या खात्रीशीर आणि स्वस्त चाचणीसाठी भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केलेली फेलुदा कोविड चाचणी किट आता जगभरातील देशांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे दरमहा १० लाख किटसचे उत्पादन देशात सुरु झाले असून डिसेंबर पर्यंत हे किट बाजारात येणार आहे.

टाटा समूहाची आरोग्य क्षेत्रातील कंपनी टाटा मेडिसिन अँड डायग्नोटीक लिमिटेडचे सीईओ कृष्णमूर्ती यांनी ही किट्स बनविण्याचे काम सुरु झाले असल्याचे सांगितले. ते म्हणाले याला टाटा एमडी चेक असे नाव दिले गेले आहे. क्रिस्पर कॅस ९ तंत्रज्ञानाचा वापर यात केला गेला आहे. सीएसआयआर व नवी दिल्ली येथील आयजीआयबी मधील वैज्ञानिकांनी ही चाचणी पद्धत शोधून काढली असून क्रीस्पर कॅस ९ वर आधारित जगातील हे पाहिले उपकरण जागतिक स्तरावर लाँच केले गेले आहे.

फेलुदा साठी परवाना मिळविण्यापासून ते लाँच करेपर्यंतची सर्व कामे फक्त १०० दिवसात केली गेली असून देशभर निदान केंद्रे आणि हॉस्पिटल मध्ये हे उपकरण उपलब्ध केले जात आहे. प्रयोगशाळेत ज्या प्रमाणे करोना चाचणी केली जाते त्याचप्रकारे यात चाचणी होते पण हे उपकरण स्वस्त आणि जलद पण अचूक निदान करणारे आहे. प्रेग्नन्सी टेस्ट पेपर स्ट्रीप प्रमाणेच हे उपकरण काम करेल आणि चाचणीचे निदान जलद करेल असे सांगितले जात आहे.