आम्ही सावळे आणि सुंदरही

unfair
गोरेपणा सौंदर्याचे मुख्य प्रतीक मानण्याची प्रथा अनादीकाळापासून जगभरात सुरूच आहे. मात्र सावळेपण अथवा काळा रंग असलेली माणसेही तितकीच सुंदर असू शकतात आणि या सौंदर्यासाठी त्यांचे सावळेपणच कारणीभूत असते हा विचार जनमानसात रूजविण्यासाठी टेक्सास विद्यापीठातील तीन मित्रांनी अनफेयर अॅन्ड लव्हली हे ऑनलाईन कँपेन सुरू केले असून त्याला अमेरिकेबरोबरच आशियाई देशातूनही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. सावळ्या महिलांना सेल्फी पाठवा असे आवाहन या साईटवर केले गेले आहे आणि भारतातील महिलांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

टेक्सास विद्यापीठातील २१ वर्षीय पॉक्स जोन्स हा याचा प्रणेता आहे. तो सांगतो माझ्या मैत्रिणी व मित्र अन्य देशांतील आहेत. त्यांना वर्णभेदावरून मिळत असलेली वागणूक मला त्रासदायक वाटली. माझ्या दोन श्रीलंकन मैत्रिणींनीही त्यांना काळ्या रंगावरून किती कॉमेंट झेलाव्या लागतात हे सांगितल्यानंतर मी त्यांचे फोटो काढले व सोशल मिडीयावर टाकले. वर्णभेद ही सामाजिक विकृती असल्याचेही त्यात लिहिले व सावळ्या महिलांनो एकत्र या हे कँपेन सुरू केले. रंगवर्णावरून होत असलेला भेदभाव संपविणे आणि सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या व्यक्तींना आत्मसन्मान प्राप्त करून देणे तसेच आपल्या वर्णाबद्दल त्यांना अभिमान वाटेल अशी भावना निर्माण करणे हा यामागचा उद्देश होता. पाहता पाहता हजारो जण या कॅंपेनशी जोडले गेले आहेत.

आपापले फोटो शेअर करताना या सावळ्या महिलांनी इतके दिवस उगागच स्वतःला कमी लेखल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहेच पण आता आम्हाला आमच्या वर्णाचा कमीपणा वाटत नाही, आमच्यात धैर्य आल्याची भावनाही व्यक्त केली आहे.

Leave a Comment