मनाची साफसफाईसुध्दा आवश्यक

bath
आपण रोज आंघोळ करतो आणि शरीर स्वच्छ करतो परंतु त्यामुळे आपले शारीरिक आरोग्यच सुधारते. मानसिक आरोग्य सुधारत नाही. मग मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय केले पाहिजे? शरीर स्वच्छ करतो तसे मनसुध्दा स्वच्छ केले पाहिजे. मनाची स्वच्छता करताना मानसिक धक्के, दुःख आणि वेदना यांची साफसफाई झाली पाहिजे. परंतु ही साफसफाई नेमकी कशी करावी हे बर्‍याच लोकांना कळत नाही. शरीराची सफाई करण्याचे ज्ञान डॉक्टरकडून मिळते. तसे मन स्वच्छ करण्याचे ज्ञान आध्यात्मिक गुरुकडून मिळत असते आणि अशा गुरुंनी मनाला स्वच्छ करण्यासाठी आपण मनाला विचलित करणार्‍या भावना, राग, नैराश्य आणि अगतिकता यापासून दूर ठेवले पाहिजे, असे सांगितलेले आहे.

आपल्या मनावर भावनांचा पगडा बसू नये अशी दक्षता घेतली पाहिजे. याउपरही भावना भडकल्याच आणि मन विचलित झाले तरी या भावना का भडकल्या याचा विचार केला पाहिजे आणि त्या भावनांचे विश्‍लेषण केले पाहिजे. हे सगळ्यांना जमेलच असे नाही. मात्र अशा प्रकारच्या विचलनावर काळ हाच उपाय असतो आणि काळ उलटला की दुःख सौम्य होते, विसरले जाते. काळ उलटेपर्यंत आपण आपले मन दुसर्‍या भावनात गुंतवले पाहिजे. असे असले तरी लहान मोठ्या घटना आणि मन भडकवणार्‍या भावना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment