तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी झाड

tree
नवी दिल्ली – अशा अनेक गोष्टी जगामध्ये आहेत की ज्यांच्यावर आपला विश्वासच बसत नाही. पण आज अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेक प्रकारची विषारी झाडे या जगात आहेत ज्यांच्यामध्ये विष असते. अशा प्रकारच्या झाडाचे फळ जर चुकूनही कुणी खाल्ले तर त्याच्या जिवावर बेतू शकते. अशाच प्रकारचे एक झाड म्हणजे मेशीनील.

जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी झाड म्हणून मेशीनील या झाडाला ओळखले जाते. एवढेच नाही तर या झाडामध्ये इतके विष असते की याची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

या झाडाच्या फळाचा स्वाद अनेक वैज्ञानिकांनी घेतलेला आहे. मेशीनीलची चव घेतल्यानंतर निकोला एच स्ट्रिकलँड नावाच्या एका वैज्ञानिकाने म्हटले आहे की एकदा मी माझ्या मित्रांसोबत केरेबियन बीचवर गेलो होतो, त्यावेळी मी या झाडाच्या फळाची चव चाखून पाहिली होती. या झाडाचे फळ खुपच कडू आहे, त्याची टेस्ट केल्यानंतर जळजळ होण्यास सुरुवात झाली आणि संपुर्ण शरीराला सुज आली. मात्र, वेळेवर उपचार झाल्यामुळे मी ठिक झालो. त्यांनी सांगितले की जर एखाद्या व्यक्तीने या झाडाचे फळ खाल्ले तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो. यामुळेच जेथे-जेथे ही झाडे आहेत त्या ठिकाणच्या परिसरात धोक्याची सुचना देणारे फलक लावण्यात आलेले आहेत.

५० फूट उंच मेशीनीलचे झाड असते. याच्या फळामध्ये भयंकर प्रमाणात विष असते, त्याचा एक थेंबही त्वचेवर पडल्यास त्वचेवर वाईट पद्धतीने जखम होते. तसेच त्या जागेवर खुप जळजळ होते आणि सुज येते. हे फळ खाल्यास अंधत्व येण्याची शक्यताही आहे. हा झाड जरी विषारी असला तरी या झाडामुळे अद्याप कुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती नाही आहे.

Leave a Comment