तुम्हाला माहीत आहेत का जगभरातील चलनांच्या नावांचा अर्थ काय ?

currancy
लंडन : जगभरातील देशांच्या चलनांच्या नावाचे मूळ ऑक्सफर्ड शब्दकोशाने शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांना विविध देशांच्या चलनांना त्यांची नावे कशी मिळाली याची माहिती मिळाली.

रुपया : संस्कृत शब्द ‘रुप्या’ ज्याचा अर्थ चांदी असा होतो यावरुन रुपया हा शब्द आला आहे. भारत, पाकिस्तान तसेच इंडोनेशिया देशांचे चलन रुपया या नावानेच ओळखले जाते.

डॉलर : जर्मनी भाषेतील ‘जोआकिमस्थालर’ या शब्दातून ‘डॉलर’ हा शब्द जन्मला आहे. ‘जोआकिमची खाण’ असा त्या शब्दाचा अर्थ आहे. या ठिकाणी चांदीच्या खाणी होत्या. जोआकिमच्या खाणीतून मिळवलेल्या खाणीतील चांदीतून नाणी तयार केली जात असत. पुढे त्यांना ‘थालर’ म्हटले जाऊ लागले. त्याचा पुढे अपभ्रंश होऊन ‘डॉलर’ हा शब्द जन्माला आला. आज जगभरात अमेरिका, ऑस्टड्ढेलिया, फिजी, न्यूझिलंड, कॅनडा आणि सिंगापूर या प्रमुख देशांच्या चलनाचे नाव डॉलर आहे.

पेसो : पेसो या शब्दाचा स्पॅनिश भाषेत शब्दशः अर्थ आहे ‘वजन’

लिरा : इटालियन आणि टर्की यांचे मूळ चलन असलेले ‘लिरा’ हे नाव ‘लिब्रा’ या लॅटिन भाषेतील शब्दावरून आले. या शब्दाचा अर्थ आहे ‘एक पौंड’ (वजन)

मार्क : युरो हे चलन उपयोगात आणण्याआधी जर्मनीचे चलन असणारे मार्क आणि फिनलंडचे चलन असणारे मक्र्का यांचा अर्थ ‘वजन मोजण्याचे एक एकक’ याच्याशी संबंधित होता.

रियाल : लॅटिन शब्द ‘रिगलीस’ ज्याचा अर्थ ‘रॉयल’ (राजेशाही) असा आहे या शब्दातून ‘रियाल’ शब्दाची उत्पत्ती झाली आहे. ओमान, इराण, कतार, सौदी अरेबिया आणि या येमन या देशांमध्ये रियाल हे चलन वापरले जाते.

रँड : दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटर्सरँड या सोन्याच्या खाणी असलेल्या ठिकाणांवरुन ‘रँड’ हे चलन आले आहे.

दिनार : जॉर्डन, अल्जेरिया, सर्बिया आणि कुवेत या देशांचे चलन दिनार आहे. प्राचीन काळी रोमन साम्राज्यात वापरल्या जाणा-या ‘दिनारिअस’ या नाण्याच्या नावावरून हा शब्द आला आहे.

पौंड : ब्रिटनचे चलन असलेले पौंड हा शब्द लॅटिन भाषेतील ‘पौंडस’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ ‘वजन’ असा होतो. इजिप्त, लेबनन, दक्षिण सुदान, सुदान आणि सीरिया ही राष्ट्रे आपापल्या चलनांना पौंड म्हणतात.

रुबल : रशिया आणि बेलारुस यांचे रुबल या चलनाचे नाव चांदी मोजण्याचे एकक असणा-या ‘रुबल’ वरून आले आहे.

Leave a Comment