असे कमी करा दारुचे व्यसन

drink
आपल्या शरीरासाठी दारुचे अतिसेवन करणे अत्यंत धोकादायक असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. एकदा जर दारुचे व्यसन लागले तर ती सवय सोडणे खुप कठीण असते. दारुची सवय सोडण्यासाठी अनेक उपायही केले तरी लवकर सुटत नाही. मात्र, असेही काही लोक आहेत ज्यांनी दारु पासुन सुटका मिळवली आहे. मात्र यासाठी संयम आणि धैर्याची आवश्यकता असते.

कुठल्याही नशेची सवय लागण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मात्र, एक अशी वेळ येते ज्यानंतर नशा करणारी व्यक्ती ही नशेची शिकार बनते. अशावेळी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही यावर नियंत्रण कसे मिळवाल.

जर तुम्हालाही दारु पिण्याची सवय लागली आहे आणि ती सोडवायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला सकारात्मक बनण्याची गरज आहे. तुम्ही दारु सोडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला मात्र, तुमची इच्छा नसेल तर तुम्ही सुटका करुन घेऊ शकत नाहीत. दारु सोडण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास उपाय घेऊन आलो आहोत.

१) कुठल्याही दुस-या कामात गुंतवुन घेणे – दारुचे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही तुमचे मन आणि डोक एखाद्या दुस-या कामामध्ये गुंतवा. तुम्ही तुम्हाला स्वत:ला दुस-या एखाद्या कामात गुंतवण्यासाठी एखादे पुस्तक वाचु शकता किंवा पार्कमध्ये फिरु शकता.

२) परिवाराला वेळ द्या – आपल्यावर कितीही वाईट वेळ आली तरी आपला परिवार आपल्यासोबतच असतो. तुम्ही तुमच्या परिवारासोबत वेळ घालवू शकता, त्यांच्यासोबत बसुन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करु शकता.

३) जास्त प्रमाणात साखर घेणे – काही लोकांना दारुची चव आणि साखरेची चव यामधील अंतर समजत नाही. अशावेळी जर तुम्ही दारुच्या व्यसनापासून त्रस्त आहात तर अतिरिक्त प्रमाणात साखरही घेऊ शकता.

४) निश्चित अंतरामध्ये खाणे – काही लोकांना भुक लागल्यानंतर दारु पिण्याची आवड निर्माण होते. अशावेळी तुम्ही प्रयत्न करु शकता की तुमचे पोट कधीही खाली असु नये. यासोबतच प्रतिदिन सहा ते आठ ग्लास पाणी प्यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment