अठराव्या वर्षी तो झाला सीईओ

jefferson-prince
कार्पोरेट विश्वामध्ये नोकर्‍या करणार्‍या प्रत्येकाच्या मनामध्ये कधी ना कधी तरी एखाद्या कंपनीचा व्हॉईस प्रेसिडेंट किंवा सीईओ होण्याचे स्वप्न असते. कारण कंपन्यांमध्ये ती शेवटची जागा असते. मात्र जेफरसन प्रिन्स हा चेन्नईचा तरुण अवघा अठरा वर्षांचा आहे. परंतु तो एका कंपनीचा सीईओ झालेला आहे. आता त्याच्या हाताखाली ७० लोक काम करत आहेत. जेफरसन प्रिन्स हा मुळात तामिळनाडूत तिरुनवेली येथे जन्मला आणि त्याचे कुटुंब तो तीन वर्षांचा असतानाच लंडनला गेले. म्हणजे हे वर्ष साधारणतः २००० हे असावे. त्यावेळी तो तीन वर्षांचा होता. त्याचे कुटुंब लंडनमध्ये राहिले असले तरी त्याने कंपनी स्थापन केली आणि त्यासाठी तो भारतात परतला.

२०११ साली त्याने लंडनच्या आपल्या घराच्या एका खोलीत आपली कंपनी स्थापन केली. त्याला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच संगणकाशी खेळण्याचा नाद होता आणि दहा-बारा वर्षे असे सातत्याने संगणकाशी खेळत खेळत त्याने काही नवे गेम तयार केले. त्याच्या वडिलांनी त्याला संगणक घेऊन दिला आणि त्याला प्रोत्साहन दिले. तो सोळा वर्षांचा असताना त्याने कंपनीचे नाव नोंदवले आणि त्या कंपनीतर्फे तो इलेक्ट्रॉनिक्स गेम्स विकायला लागला. त्याला याची कल्पना नव्हती. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने एका प्रदर्शनामध्ये आपल्या गेम्सचा स्टॉल मांडला होता.

त्यात त्याने काही ऍप्स ठेवलेले होते. शाळेत जाणार्‍या आपल्या मुलावर लक्ष ठेवण्यास उपयोगी पडणारे ऍप होते आणि दुसरा एक गेम होता. त्यातून त्याला पैसे मिळाले आणि त्याला हुरूप आला. त्याने कंपनी स्थापन करून पुढे वाटचाल सुरू केली. त्याच्या असे लक्षात आले की आपल्या मायभूमीमध्येच संधी आहे. मग तो भारतात परत आला आणि त्याची कंपनी वाढत गेली. त्याच्या कंपनीचे नाव आय कॅज्युअल एंटरटेनमेंट असे असून चेन्नईजवळ त्याची चारमजली इमारत आहे. आता त्या कंपनीचा सीईओ आहे आणि ७० लोकांना रोजगार देत आहे.

Leave a Comment