एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्ये प्रकरणी मुख्यमंत्र्यावर कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करा


मुंबई – जळगाव येथील एका एसटी कर्मचाऱ्याने अनियमित पगाराला कंटाळून महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरत आत्महत्या केली. विरोधकांनी या घटनेनंर ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. यातच या घटनेवर भाजप नेते निलेश राणे यांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोलिसांनी हिंमत दाखवत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असेही निलेश राणे म्हणाले आहेत.


पोलीसांनी हिंमत दाखवावी आणि उद्धव ठाकरेवर SEC 306 अंतर्गत गुन्हा नोंदवावा. ST कामगार तडफडत आपला जीव देत आहे, या सरकारला त्यांच्या जीवाची काय पडलेली नाही. ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या ST गाड्या मंत्रालयाच्या आवारात उभ्या कराव्यात मग बघा प्रश्न सुटतो की नाही, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.


त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अनिल परब स्वतःला इतका शहाणा समजतो की परवा मराठा समाजाने काढलेल्या मोर्चा मधून एका समन्वयकाने त्याला फोन केला आणि आमचं निवेदन घ्या असं सांगितलं. ह्या अनिल परबने मान्य केलं आणि त्यांना पाच तास थांबवून ठेवलं आणि नंतर आलाच नाही. ह्या घमेंडी अनिल परबला एसटी कामगारांचे दुःख काय समजणार, असेही निलेश राणे म्हणाले आहेत.