दिल्लीच्या एका वकिलाने विकत घेतला दाऊद इब्राहिमचा वडिलोपार्जित बंगला


मुंबई : व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 7 मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. त्यापैकी एक असलेल्या रत्नागिरी येथील दाऊदच्या वडिलो पार्जित बंगल्याचाही लिलाव करण्यात आला असून हा बंगला केवळ 11 लाख 20 हजारांना दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी विकत घेतला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी खेड जिल्ह्यात ही सर्व मालमत्ता आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिमच्या 7 पैकी 6 मालमत्तांचा लिलाव झाला आहे. डिजीटल पद्धतीने मुंबईतून दाऊदचे घर आणि शेतीचा लिलाव झाला. पण मुंबके गावातील शेतकरी लिलावात सहभागी झाले नाहीत. स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नसल्याची माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली.

दाऊदची वडिलो पार्जित जमीन आणि घरांचा लिलाव सेफमातर्फे करण्यात आला. यापूर्वी मुंबईमधील दाऊदच्या जवळपास सर्व प्रॉप्रटींचा लिलाव करण्यात आला आहे. आता रत्नागिरीतील त्याची कौटुंबिक जमीन आणि घराचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात आला. दरम्यान, दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर मुंबके गावातील मालमत्ता आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर फरार झाला. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला असून आता कोकणातील प्रॉपर्टीचा लिलाव करण्यात आला.

सध्या त्याचे काका कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित जमीन कसत आहेत. पण, आता लिलाव होत असेल तर सरकारच्या नियमांप्रमाणे व्हावे, अशी आशा दाऊदच्या काकांनी व्यक्त केली. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाबाबत अनेकांना उत्सुकता होती. सेफमाचे संबंधित अधिकारी सय्यद मुनाफच्या माहितीनुसार दाऊदच्या एकूण 17 प्रॉपर्टी शिल्लक आहे. त्यातील 7 पैकी 6 मालमत्तांचा लिलाव झाला. कोरोनामुळे फक्त ई-लिलाव आणि टेंडर मार्फत लिलाव करण्यात आला.