ही गाय दरदिवशी देते ६६.७ लीटर दूध

cow
चंदिगड : भले गाईवरून देशात सध्या रामायण सुरू आहे. परंतु, पंजाबमधील हीच गाय एका शेतकऱ्याला वरदान ठरली आहे. हा शेतकरीही या गाईमुळे चर्चेत आला असून, या गायीने पंजाबमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. या गाईचा विक्रम आपण ऐकाल तर तुमची भंबेरी उडेल.

पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील शेतकरी असलेल्या हरप्रीत सिंह हुंदाल यांच्या मालकीची असलेली ही गाय दरदिवशी ६६.७ लीटर दूध देते. पंजाबमधील सर्व गाईंचे विक्रम या गाईने मोडीत काढले आहेत. पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सरदारपुरा गावातील एका शेतकऱ्याकडे असलेल्या गाईच्या नावावर या पूर्वी सर्वात जास्त दूध देण्याचा विक्रम होता. ही गाय दिवसाला ६१.८ लीटर इतकी दूध देत असे. हरप्रीत सिंह यांच्या गाईच्या विक्रमामुळे नवा विक्रम प्रस्तापीत झाला व जूना विक्रम मोडीत निघाला.

गायीचा मालक हरप्रीत सिंह यांना या राष्ट्रीय विक्रमामुळे १.५ लाख रूपयांचे बक्षिसही मिळाले आहे. गाईचे मालक हरप्रीत सिंह सांगतात, प्रतिदिन १५ किलो चारा या गाईला लागतो. त्यासोबतच गाईच्या इतर खाण्यापीण्याचीही विशेष काळजी घेतली जाते. ३०५ दिवसात १७,००० लीटर दूध देण्याचा विक्रमही या गाईने केल्याचे हरप्रीत सिंह सांगतात. ह्युमॅनिटीजमध्ये ग्रॅज्युएशन केलेले हरप्रीत सिंह हुंदाल गेल्या वर्षांपासून डेअरीचा व्यवसाय करतात.

Leave a Comment