शिवकाशी- आतषबाजीची राजधानी

fatake
दिवाळी अथवा नववर्ष फटाके फोडल्याशिवाय साजरे होऊ शकत नाही. चीनमध्ये जगातील सर्वाधिक फटके उत्पादन होते मात्र त्याखालोखाल ते भारतात होते. तमिळनाडूतील शिवकाशी हे छोटेसे गाव आतषबाजीची राजधानी म्हणून देशभरातच नाही तर परदेशातही नाव कमावून आहे. या गावात दरवर्षी २० हजार कोटींची उलाढाल या व्यवसायात होते आणि गेली १०० वर्षे येथे फक्त फटाकेच बनविले जात आहेत. या छोट्याश्या गावात फटके बनविणारे ८०० कारखाने असून त्यात ७ लाख कर्मचारी काम करतात.

यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्यावर बंदी आणल्याने या गावातील कर्मचारी चिंतेत होते कारण देशभरात मोठ्या प्रमाणावर फटाके उडविले गेले कि येथील हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. या गावाला पंडित नेहरू यांनी मिनी जपान असे नाव दिले होते.

shivkashi
या ठिकाणी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली ती नडार बंधूनी.या दोघा भवानी १९२२ साली काडेपेटी बनविण्याचे प्रशिक्षण कोलकाता येथे जाऊन घेतले आणि गावी परत येऊन काडेपेटी बनविण्याचा कारखाना सुरु केला. त्याचा विस्तार करताना १९४२ पासून या दोघा भावांनी वेगळे होऊन फटाके बनवायला सुरवात केली. आज स्टँडर्ड फायर वर्क्स आणि कालीश्वरी फायर वर्क्स हे भारतातील दोन मोठे कारखाने म्हणून ओळखले जातात आणि येथे बनलेले फटाके परदेशात निर्यात होतात. या बंधूनी चीन मधेही कारखाना काढला आहे.

शिवकाशी मध्ये वर्षातील ३०० दिवस फटाके बनविण्याचे काम चालते आणि त्यात महिला आणि लहान मुले सामील आहेत. आता येथे प्रदूषण विरहित फटाके बनविले जातात. येथील शाळा आणि महाविद्यालये गरिबांना मदत देतात. या छोट्या गावात ८ फायर स्टेशन असून २० अग्निशमन बंब आहेत.

Leave a Comment