युएई इस्लामिक कायद्यात बदलाने दारू पिणे वैध

फोटो साभार न्यूज मिनिट

सामाजिक सुधारणांचे जोरदार वारे वाहात असलेल्या संयुक्त अरब अमिरातीने इस्लामिक पर्सनल लॉ मधील बदलाच्या ऐतिहासिक निर्णयाने त्यावर मोहर उठविली आहे. नव्या बदलानुसार आता मुसलमान लोकांना दारू प्राशन तसेच लिव इन रिलेशनशिप साठी कायद्याची मान्यता मिळाली आहे. यापूर्वी या दोन्ही कृती गुन्हा गणल्या जात होत्या आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद कायद्यात होती. पूर्वीच्या कायद्यानुसार या दोन्ही कृती पाप समजल्या जात असत. विशेष म्हणजे आता नव्या कायद्यात ऑनर किलिंग हा गुन्हा ठरविला गेला आहे.

नव्या बदलामुळे दारू प्राशन करणे हा गुन्हा ठरणार नाही. तसेच एखाद्या प्रेमी जोडप्याला लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचे असेल तरी ते शक्य होणार आहे. अन्य बदलाने आता २१ वर्षावरील कुणीही नागरिक दारू विकणे, खरेदी करणे आणि प्राशन करण्यास मुक्त असून त्यासाठी त्याला परवाना घ्यावा लागणार नाही. अर्थात २१ वर्षाखालाच्या लोकांना मात्र अजून ही परवानगी कायद्याने दिलेली नाही.

युएईने अमेरिकेच्या मध्यस्तीने आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती मधील संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.