ही आहे ‘मसल बार्बी’, जिच्या सौंदर्याने लाखो तरुण घायाळ

julia-vins
मॉस्को : सुंदर मुली म्हटले की, आपल्या नजरे समोर दिसायला सुंदर, गो-या रंगाची, आकर्षक देहबोली असणारी साधारण उंची असलेली सडपातळ मुलगी येते. मात्र ‘मसल बार्बी’ दिसायला तर खुपच सुंदर आहे, मात्र ती जे काम करते ते पाहून थक्कच व्हाल. लाखो तरूणांना १८ वर्षाच्या रशियन बॉडीबिल्डर ज्यूलिया विन्सच्या सौदर्याने वेड लावले आहे.
julia
‘मसल बार्बी’ या नावाने ज्यूलीया तिच्या देशात प्रसिध्द असून तिच्यावर प्रेम करणा-यांची रशियात कमी नाही. बार्बी प्रमाणे ज्यूलिया दिसायला जरी असली तरी तिची शरीरयष्टी ही बॉडीबिल्डरप्रमाणे आहे. २१ मे १९९६ ला जन्मलेली ज्यूलिया लहानपणापासूनच खुपच सुंदर आहे. ज्यूलिया जसजशी मोठी होत गेली, तसतसे तिला वाटत गेले की, आपण स्वतःची सुरक्षा करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. हाच विचार डोक्यात घेऊन तिने जिम जॉईन केले. त्यानंतर ती नियमित जिम ला जाऊ लागली आणि आज ती एक प्रसिध्द बॉडीबिल्डर आहे. तसेच ज्यूलियाने पॉवरलिफ्टींगमध्येही आपले करिअर घडवले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment