स्वस्त आणि मस्त लावा फ्लिप फिचर फोन

देशी ब्रांड लावाने नवा फिचर फोन लावा फ्लिप लाँच केला असून त्याची किंमत आहे १६४० रुपये. किंमतीच्या मानाने या फोनची फिचर खुपच चांगली आहेत. हा फोन १२ ते १५ वर्षापूर्वीच्या फिचर फोनची आठवण ग्राहकांना करून देईलच पण ज्येष्ठ ग्राहकांबरोबर युवा पिढीलाही तो आकर्षित करेल असे त्याचे डिझाईन आहे. लाल आणि निळ्या रंगात तो उपलब्ध केला गेला आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट सह रिटेल स्टोर मध्ये तो विक्रीसाठी आला आहे.

या फोनचा लुक खास आहे. आकर्षक बॉडीसह की पॅड सेम कलर मध्ये असून त्याला कॅमेरा सेटअप आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन फिचर्स दिली गेली आहेत. २.४ इंची डिस्प्ले, पॉली कार्बोनेट बॉडी, ड्युअल सिम दिले गेले आहे. सिंगल चार्ज मध्ये तीन दिवस चालणारी १२०० एमएएच बॅटरी, ३२ जीबी पर्यंत मेमरी वाढविण्याची सुविधा आणि हिंदी, इंग्लिश सह २२ भाषांत मेसेज टाईप करणे आणि रिसिव्ह करण्याची सुविधा यात आहे. शिवाय फोन साठी एक वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे.

अन्य फीचर मध्ये टॉर्च, वायरलेस एफएम, नंबर टॉकर यांचा समावेश आहे.