साध्या लक्षणावरून रोगाचे निदान

doctor
कोणत्याही विकाराचे निदान करण्याच्या जगमान्य पध्दती आहेत. साधारणतः लघवी, रक्त यांची तपासणी करून किंवा मलाची तपासणी रोगाचे निदान केले जाते. परंतु अलीकडच्या काळात अशाप्रकारच्या चाचण्या खूपच महाग होऊन बसल्या आहेत. त्यामुळे त्या गरीब लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून काही अनुभवी डॉक्टरांनी अगदी सोप्या सोप्या लक्षणांवरून काही विकारांचा अंदाज लागतो असा दावा केला आहे. त्यांच्या अनुभवी नजरेला तसे आढळले आहे.

अन्नावरची वासना उडालेली असेल पण तरीही बर्फ, माती असे काही खाण्याची इच्छा होत असेल तर आपल्याला अशक्तपणा किंवा रक्तक्षयाची बाधा होण्याची शक्यता असते. या संबंधीची माहिती अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसीन या मासिकात प्रसिध्द झाली आहे. अशक्त रुग्णांना बर्फ खाण्याची फार इच्छा होते असे काही डॉक्टरांना आढळले. त्यावरून त्यांनी या लक्षणांचा आणि अशक्तपणाचा संबंध जोडला आहे.

श्‍वासाला दुर्गंध येत असेल तर त्यामागचे कारण दातांची स्वच्छता न करणे हे असते. ही गोष्ट खरीच आहे. परंतु डॉक्टरांच्या मते तोंडाला दुर्गंध येणे हे लिव्हर बिघडल्याचे लक्षण असते आणि त्यावरून लिव्हरची कार्यक्षमता घटत चालल्याचे समजून येते. तोेंडाच्या दुर्गंधीचा संबंध काही अनुभवी डॉक्टरांनी मधुमेहाशीसुध्दा जोडलेला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment